Friday, July 20, 2007

उदास



उदास माझे मन,
उदास माझ्या यातना,
उदास माझे जीवन,
उदास माझ्या भावना.

उदास माझे स्वप्न,
उदास माझ्या कविता,
उदास माझे रंग,
उदास माझा आत्मा.


उदास माझी भक्ती,
उदास माझी नीती,
उदास माझी किर्ती,
उदास माझी प्रीती.

उदास………… उदासीनता वेळोवेळी,
उदास………… उदासीनता जागोजागी,
उदास………… उदासीनता घराघरात,
उदास………… उदासीनता तुझ्या-माझ्यात.

© सचिन चाफेरकर.

Saturday, July 14, 2007

प्रिय आईस

आ मन्ह्जे आत्मा
ई मन्ह्जे ईश्वर
अहोरात्र कष्ट करुन सदैव
हसत राहणारा तो परमेश्वर.

© सचिन चाफेरकर.

कसोटी

प्रेम काय कोणीही करत
पण खरा अर्थ ते समजण्यात आहे.
प्रेम काय कोणाला हि जमते
पण खरी कसोटी ते टिकवण्यात आहे.

© सचिन चाफेरकर.

आई - बाबा



आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.

आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली.

आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली.

त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
म्हणून तर जगामधे माझी आज ख्याती आहे.

© सचिन चाफेरकर.

आस धरून बसलो आहे


ना ही अर्थ होता माझ्या शब्दांना
ना ही अबोला होता या जीवाला
भान हरपून गेले आहे
काय झालय माहीत नाहि मला ??





बंधनात शब्दांच्या मी अडकतोय,
भाव मैत्रीचा मनी वसवतोय,
कधी हसतोय, कधी हसवतोय
मन माझे मलाच चकवतोय.

उन्हाने भिजून गेलो आहे मी
त्यागाने झलून गेलो आहे मी
श्रमाने थकून गेलो आहे मी
तुझ्या आठवणीत रुतून गेलो आहे मी

तूझा एक स्पर्श आणि त्याचा
व्यासंग मला इतके कर्म करायला
भाग पाडत आहेत....

तरी ही त्या चातकासारखा तुझ्या
वाटेवर आस धरून बसलो आहे.

© सचिन चाफेरकर.

चांदनी रात


त्या मिठीची मिठास काहि औरच होती
रंग भरुन आलेली ती चांदनी रात होती
आज हि मिठी आणि तिचा आभास आहे
आज हि माझ्या आठवणीत ति चांदनी रात आहे.

तो गजरा तुझ्या केसात फ़ुलला होता
थोडेस आयुष्य तो ही जगला होता
सोबती होत तो त्या क्षणाचा
जीवनातल्या एका सुंदर वलनाचा

तारा तुटताना पाहुन आकाश हि गोठले
प्रेमात बुडालेल्याला भानावर आनले.
आता ते वळन मागे राहिले आहे
जगणे एक वचन राहिले आहे


रात्र सरली गजराही कोमेजला आहे
हाती उरला आठवणींचा दोरा आहे
आता जागो जागी फक्त तीचाच भास आहे
कारण पुन्हा उगवली चांदनी रात आहे.

© सचिन चाफेरकर.

Friday, July 13, 2007

असा एक क्षण





सुख जीवनात रोज़च येतात,
पण दुःख जेव्हा पाटलाग करतात तेव्हा ....

तेव्हा रस्त्यात येना-या सुखांची
चव ही कडूच लागते,
तेव्हा पावसात मोठी झालेली राने
ही ओसड वाटू लागतात.

तेव्हा दीलासा देनारे शब्द ही
बोचरे वाटू लागतात,
तेव्हा गर्दीत ही एकाकी पणा जाणवतो
आणि छोटी ठैच ही जख्म करुन जाते.

म्हणून सुखात भारावून न जाता
येना-या दुःखांसाठी असा एक क्षण
आठवणीत जरूर ठेवावा की जो दुःखात ही
तुमची जिदद् मोडणार नाही, तुमच्या
वैतागलेल्या चेह-यावर हसु आणेल.
आणि या क्षणात बधिर होना-या दुनियेत
तुमचे माणूसपण टिकवून ठेवेल.


© सचिन चाफेरकर.

किनारा


असा एक किनारा असावा
माणसा मणसात जिथे वाद नसावा
नसावी तिथे कसलीच भिती
वावरुदे तिथे सदा प्रिती

असा हि एक किनारा असावा
जीथे वारा उनाड असावा
पाना झाडातुन वारा शिळ घालत सुटावा
श्वासात ही माणसाच्या भेदभाव नसावा.

काहि किनारे असे हि असतात
जे फक्त स्वप्नात दिसतात
ज्यान्च्या वर्णनासाठी शब्द कमी पडतात
असे किनारे स्वप्नातच का बरे दिसतात ??


@ सचिन चाफेरकर.