Thursday, May 31, 2007

त्रिवेणी

पाणी निरजंतुक करुन ही
तहान भागत नाहि
.
.
.
.
सर्वांच्या इच्छा इथे अतुप्त (atrupt)

© सचिन चाफेरकर.

श्वास

श्वास थांबतो पण
नाती काहि तुटत नाहि
मडके फुटते पण
आठवणि मात्र पुसत नाहि.

© सचिन चाफेरकर.

नाती

सर्वच नाती रक्ताची नसतात
काहि विचारांनी स्वभावानी बनतात
काहि अनपेक्षितपने ताणली जातात
आणि काहि न ताणताहि तुटुन जातात.

© सचिन चाफेरकर.

विरह

विरह आणि प्रेमाचे अतुट नाते असते
म्हणून ते जरा जपून करायचे असते
होत नाहि प्रत्येकाचा शेवट गोड , म्हणून
पहिल्यापासुन मन खंबीर करायचे असते.

© सचिन चाफेरकर.

प्रश्न

देण्यासारखे आहे काय ?
प्रश्न विचारला तिने
सारेच देऊन बसलो होतो
काहिच उरले नव्ह्ते माझे.

© सचिन चाफेरकर.

SEZ ... Special economy zoneच्या

SEZ ... Special economy zoneच्या नावाखाली राजकारणी शेतकरंयाचा बळी घेत आहेत.

खांदयावर निश्चिंत डोके ठेवावे
त्यानेच वासनेने बळी घ्यावा .
कसे फुलावे फुलांनी मशागत
करणारा मातीचा दलाल झाला.

© सचिन चाफेरकर.
प्रेमात मी इतका वाहून गेलो कि
मला वेळेचे भान राहिले नाहि,
आता भानावर आलो आहे
पण वेळ निघुन गेली आहे.


© सचिन चाफेरकर.
प्रेम म्हणजे अफूची गोळी आहे
प्रेमभंग होइपर्यंत माणुस नशेत असतो,
चुकून कधी भानावर आला
तरीहि पुरता लुटलेला असतो.

@ सचिन चाफेरकर.
खेळ समजून खेळलात तर
हार-जीत तर असनारच
पान गलिच काय विचारता
त्या श्रावणात पण गलणारच.

@ सचिन चाफेरकर.
कुष्टरोग झाला आहे
माझ्या मनाला
तिच्या आठवनीने वेदना
होत नाहित शरीराला.

© सचिन चाफेरकर.
तुझी आठवण येताच मी
प्रवाहाच्या विरुध्द पोहू लागतो
प्रयत्न असतो किना-यावर यायचा
मन विचारांच्या भोव-यात अडकलेले असते.

© सचिन चाफेरकर.
दोन अश्रु तेव्हा ओघळ्ले असते
माझे प्रेम तुला हि कळ्ले असते
पण दानात मिळेल ते प्रेम कसले
म्हणुन माझे अश्रु डोळ्यात सुकले.


© सचिन चाफेरकर.