Tuesday, January 30, 2007

ती गेली तेव्हा

ती गेली तेव्हा मी हि
गेलो तिला सोबत द्यायला
मला माहित होते
ती येणार नाहि परत
तरी हि चालत होतो कदाचित
प्रेम बोलतात याला.

तरी हि ....

रोज़ काहि ना काहि
रोज़ काहि ना काहि
तरी हि हसतोय,
रोज मरतोय
तरी हि जगतोय.

विषय

चारोळ्या करायला विषय लागतो का ?
त्या तर चालता बोलता होतात.
मनातले शब्द ओठावर येतात
आणि मला चारोळी सुचतात.

प्रेम

प्रेम श्रध्दा, प्रेम सबुरी
प्रेम व्यथा, प्रेम लाचारी
प्रेम रक्त, प्रेम श्वास
प्रेम शब्द, प्रेम ध्यास.

चारोळी

चारोळीच्या चार ओळी
मनाला भावून जातात,
प्रत्येक ओळीचा प्रत्येक
अर्थ मनाला वाहून नेतात.

Friday, January 26, 2007

विरह

तुझ्या प्रेमापेक्षा तुझ्या
विरहाने खुप काहि शिकवलं,
सरणाच्या लाकडाने
अंकुराचे जगण अनुभवल.

© सचिन चाफेरकर.

Thursday, January 25, 2007

मी व्याकुळ


मी व्याकुळ

शब्दांचा झाडाच्या सावलीचा,
धरतीच्या सुगंधाचा,
चंद्राच्या मंद प्रकाशाचा.


मी व्याकुळ....
सुर्यांच्या किरणांचा
पाण्यातील प्रतिबिंबाचा
निस्वार्थी मित्रांचा
मधुर गीतांचा


मी व्याकुळ….
निसर्गाच्या देंणगीचा
मनातील विचारांचा
हातातील लेखनीचा
शब्दांच्या खेलाचा



मी व्याकुळ….
आईच्या मायेच्या
वडिलांच्या आधाराचा
भावा बरोबरच्या वादाचा
बहिनीच्या राखीचा