Friday, July 13, 2007

किनारा


असा एक किनारा असावा
माणसा मणसात जिथे वाद नसावा
नसावी तिथे कसलीच भिती
वावरुदे तिथे सदा प्रिती

असा हि एक किनारा असावा
जीथे वारा उनाड असावा
पाना झाडातुन वारा शिळ घालत सुटावा
श्वासात ही माणसाच्या भेदभाव नसावा.

काहि किनारे असे हि असतात
जे फक्त स्वप्नात दिसतात
ज्यान्च्या वर्णनासाठी शब्द कमी पडतात
असे किनारे स्वप्नातच का बरे दिसतात ??


@ सचिन चाफेरकर.

No comments: