Friday, July 13, 2007

असा एक क्षण





सुख जीवनात रोज़च येतात,
पण दुःख जेव्हा पाटलाग करतात तेव्हा ....

तेव्हा रस्त्यात येना-या सुखांची
चव ही कडूच लागते,
तेव्हा पावसात मोठी झालेली राने
ही ओसड वाटू लागतात.

तेव्हा दीलासा देनारे शब्द ही
बोचरे वाटू लागतात,
तेव्हा गर्दीत ही एकाकी पणा जाणवतो
आणि छोटी ठैच ही जख्म करुन जाते.

म्हणून सुखात भारावून न जाता
येना-या दुःखांसाठी असा एक क्षण
आठवणीत जरूर ठेवावा की जो दुःखात ही
तुमची जिदद् मोडणार नाही, तुमच्या
वैतागलेल्या चेह-यावर हसु आणेल.
आणि या क्षणात बधिर होना-या दुनियेत
तुमचे माणूसपण टिकवून ठेवेल.


© सचिन चाफेरकर.

No comments: