Saturday, July 14, 2007

आई - बाबा



आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.

आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली.

आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली.

त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
म्हणून तर जगामधे माझी आज ख्याती आहे.

© सचिन चाफेरकर.

No comments: