
ना ही अर्थ होता माझ्या शब्दांना
ना ही अबोला होता या जीवाला
भान हरपून गेले आहे
काय झालय माहीत नाहि मला ??
बंधनात शब्दांच्या मी अडकतोय,
भाव मैत्रीचा मनी वसवतोय,
कधी हसतोय, कधी हसवतोय
मन माझे मलाच चकवतोय.
उन्हाने भिजून गेलो आहे मी
त्यागाने झलून गेलो आहे मी
श्रमाने थकून गेलो आहे मी
तुझ्या आठवणीत रुतून गेलो आहे मी
तूझा एक स्पर्श आणि त्याचा
व्यासंग मला इतके कर्म करायला
भाग पाडत आहेत....
तरी ही त्या चातकासारखा तुझ्या
वाटेवर आस धरून बसलो आहे.
© सचिन चाफेरकर.

No comments:
Post a Comment