Thursday, April 29, 2010

उद्या याच विचारात ...

गलबलाट , कलकलाट
मनातले सांगण्यासाठी
मनाचा आवाज
भिनतो अंगात.

कूस बदलतो,
आठवणीतल्या संचातली
जिथे असू तू आणि मी
अशी जागा शोधतो.

काही शब्द घुटमलतात
काहींना आकार देतो
अन गुंफवतो शब्द
तुझ्या होकारासाठी.

हलकीच झुळूक येते
अन झोपी जातो.
उद्या याच विचारात
रात्र जगवण्यासाठी.

© सचिन चाफेरकर.
०५/०२/२०१० - ११.५३

Friday, March 26, 2010

मोनोपोली

प्रश्नांना उत्तर देता आले असते तर...

कुठलेच प्रश्न अनूत्तरीत राहिले नसते...

पण मग प्रश्नाचे महत्व कोणाला कळालेच नसते...

स्व:ताचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याची हि मोनोपोली.


प्रश्नाला प्रती प्रश्न विचारून गुंगवता येते..

पण तो हाडाचा प्रश्न असतो...

प्रश्न हा गुणधर्म त्याच्यात इतका चिटकलेला असतो कि

एका ठराविक रेषेपर्यंत तो सगळ्यांना मोकळीक देईल हि

हिंडा, बागडा मनाला वाटेल तसा धिंगाणा घाला .... पण...

पण त्या अस्पष्ट रेषे जवळ आलो कि प्रश्न पडतातच...

अन सुरु होतो पुन्हा मोनोपोलीचा खेळ.



© सचिन चाफेरकर.

Friday, August 24, 2007

जेव्हा तुझा मी विचार करतो



जेव्हा तुझा मी विचार करतो,
तेव्हा मी माणसात नसतो,
लोकांना मी वेडा वाटतो,
माझा त्यांच्यावर राग नसतो.

हिवाळ्यात थंडी पडते छान,
झाडाचे गळून पडते पान,
जेव्हा त्या पाने नसलेल्या झाडाकडे पाहतो,
तेव्हा हि मला तुझा विचार असतो.

उन्हाळ्यात जेव्हा सुर्य तापतो,
सुर्याच्या उन्हाने आंबा पिकतो,
उन्हाच्या गर्मीने आंब्याच्या झाडाखाली बसतो,
तेव्हा हि मला तुझा विचार असतो.

पावासाळ्यात धो धो पाऊसा पडतो,
इकडे-तिकडे सैरावैरा माणूस पळतो,
पावसाच्या पाण्याने ओळा चिंब भिजतो,
तेव्हा हि मला तुझा विचार असतो
तेव्हा हि मला तुझा विचार असतो.

© सचिन चाफेरकर.

Wednesday, August 22, 2007

अस्तित्व



तिच्या पंखाखाली
नेहमीच उब मिळाली
मी मात्र आसमान
गाटण्यासाठी भरारी घेतली

मस्तीत मीच माझ्या
चोहिकडे फिरत होतो
रोज नविन नविन लक्ष
नविन शिखर गाटत होतो

अंधुक डोळ्यांनी परतीच्या
वाटेवर टक लावुन बसायची
नव्हता कशाचा मोह तीला
माझी आवड तिची असायची

तिच्या बोलण्यात नेहमी
आपलेपणा असायचा
मला मात्र शब्द तिचे
बन्दिंश भासायची.

अस्तित्व म्हणजे काय ??
हा प्रश्न काल पर्यंत
माझ्यासाठी गौण होता
पण आता त्याची
जाणिव होतेय

आता मात्र मला
तिची उणीव भासतेय
नजरेआड आईला
माझी नजर शोधतेय.

© सचिन चाफेरकर.

पाउस



दर वर्षी पाउस पडतो
दर वर्षी असे होते

पाणी निघुन गेल्यावर
घराभोवती चिखल होतो

मग ऐकू येते हाक
सरकारच्या मदतीची

नावाला शे-पाचशे कोटि
भेटत नाहि आम्हाला रोटि

दर वर्षी पाउस पडतो
दर वर्षी असे होते

मंत्री गावाला भेट देतो
दर वर्षी नवी गाडी घेतो

पाण्याच्या भितीने पक्क
घर कोणी बांधत नाहि

तो मात्र waterfall
जवल resort बांधतो.

आम्हाला काय त्याचे आम्ही
रोज़ resort चा पहारा देतो.

दर वर्षी पाउस पडतो
दर वर्षी असे होते

गाव डुबायला लागला कि
resort जवल सहारा घेतो

परत मदत आली कि त्याच
resort ची डागडूगी होते.

दर वर्षी पाउस पडतो
दर वर्षी असे होते

पाणी पुलावरुन गेले कि
हा खेल सारा होतो.

काय गेले काय उरले यात
कालजाचा ठोका चुकतो

वाहुन आलेल्या मातीची
बनवतो मडके आणी चूली

मदत फक्त नावाला इथे
कोणी नाहि कोणाचा वाली.

© सचिन चाफेरकर.

Friday, July 20, 2007

उदास



उदास माझे मन,
उदास माझ्या यातना,
उदास माझे जीवन,
उदास माझ्या भावना.

उदास माझे स्वप्न,
उदास माझ्या कविता,
उदास माझे रंग,
उदास माझा आत्मा.


उदास माझी भक्ती,
उदास माझी नीती,
उदास माझी किर्ती,
उदास माझी प्रीती.

उदास………… उदासीनता वेळोवेळी,
उदास………… उदासीनता जागोजागी,
उदास………… उदासीनता घराघरात,
उदास………… उदासीनता तुझ्या-माझ्यात.

© सचिन चाफेरकर.

Saturday, July 14, 2007

प्रिय आईस

आ मन्ह्जे आत्मा
ई मन्ह्जे ईश्वर
अहोरात्र कष्ट करुन सदैव
हसत राहणारा तो परमेश्वर.

© सचिन चाफेरकर.